अहमदनगर प्रतिनिधी – अमोल भांबरकर
दिल्लीगेट येथील विश्व हिंदु परिषदेच्या कार्यालयात विश्वहिंदु परिषदेचे प्रांत धर्मप्रसार प्रमुख मिलिंद मोभारकर यांच्या प्रमुख उपस्तिथीत विश्वहिंदू परिषदेची जिल्हा बैठक संपन्न झाली.
बैठकीत बजरंगदलाच्या शहर संयोजकपदी कुणाल भंडारी,बजरंगदलाच्या शहर सह संयोजकपदी सतीश सायंबर,मातृशक्तीच्या शहर संयोजकपदी अनुरिता झगडे,मठमंदिर संपर्क समितीच्या शहर प्रमुखपदी मनोहर भाकरे,दिग्विजय बसापुरे,जिल्हा महाविद्यालयीन प्रमुख नियुक्तीची घोषणा करण्यात आली.
याप्रसंगी विश्वहिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष अॅड.जय भोसले,जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे,कोषाध्यक्ष मुकुल गंधे,मठ मंदिर समितीचे जिल्हा प्रमुख हरिभाऊ डोळसे,मातृशक्ती संयोजिका शारदाताई होशिंग,प्रांत मीडिया प्रमुख अमोल भांबरकर,शहरमंत्री श्रीकांत नांदापूरकर आदींसह जिल्हा व शहर पदाधिकारी उपस्तिथ होते.या नियुक्ती बद्दल सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. यानंतर कुबेर गणेश मंदिरात महाआरती करण्यात आली.
मिलिंद मोभारकर म्हणाले की,सर्व कार्यकर्त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशसेवा व धर्म कार्य करावे. विश्व हिंदू परिषद सेवा सुरक्षा आणि संस्कार या त्रिसूत्री प्रमाणे समाजकार्य व धर्मकार्य करीत आहे प्रत्येकाने हिंदू संस्कृती टिकविण्यासाठी परंपरा चालू राहण्यासाठी प्रयत्नशील रहावे तसेच आपल्या धर्मावर आक्रमण होऊ नये यासाठी धर्माप्रती निष्ठा बाळगावी,गोसेवा व मातृभूमीची सेवा करावी,असे आवाहन केले.