कर्जत प्रतिनिधी – गणेश जेवरे
आमदार रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत. राज्यातील दहा ते पंधरा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देखील ते घेऊ शकतात मात्र तसे न करता ज्या जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे त्या कर्जत जामखेड मधील जनतेसाठी हा नातू मंत्रालयाच्या प्रत्येक विभागात उंबरे झिजवत आहे आणि अशा पद्धतीचे नेतृत्व लाभणे हे खऱ्या अर्थानं भाग्याची गोष्ट आहे असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी कर्जत येथे बोलताना प्रतिपादन केले.
काल कर्जत येथे तहसील कार्यालय यांच्या वतीने व कर्जत-जामखेड एकात्मिक संस्था यांच्या सहकार्यातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने विशेष मोहिमेतील लाभार्थ्यांना लाभ मंजुरी आदेश वाटप कार्यक्रम येथील समर्थ माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर झाला.
यावेळी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आमदार रोहित पवार प्रांत अधिकारी अजित थोरबोले, तहसीलदार नानासाहेब आगळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, ह भ प वामन खराडे गुरुजी , माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत,नगराध्यक्ष उषा राऊत, उपनगराध्यक्षा रोहिणी घुले,सभापती मनीषा जाधव, उपसभापती राजेंद्र गुंड, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष काकासाहेब तापकीर युवक अध्यक्ष नितीन धांडे, शहराध्यक्ष सुनील शेलार,गटनेते संतोष मेहत्रे, सचिन कुलथे सचिन घुले ओमकार तोटे नानासाहेब शेळके धनराज कोपनर उमेश परहर,प्रतिभाताई भैलुमे,यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
राज्य सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न
यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी राज्यातील भाजप नेत्यांवर निशाणा साधला ते म्हणाले की, केंद्रातील अशी एकही एजन्सी नाही की जिचा वापर करून या राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही.यासाठी खोटे आरोप केली,मंत्र्यांना तुरुंगात डांबले मात्र यश येत नाही म्हणून आता धार्मिक वाद राज्यांमध्ये उभा करून अस्थिरता निर्माण करण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न आहे .
राम शिंदे यांच्यावर टीका
यावेळी श्री मुंडे यांनी माजी मंत्री राम शिंदे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता होती.कर्जत जामखेड तालुक्यातील जनतेने दोन वेळा निवडून दिले.राज्यामध्ये मंत्री झाले. परंतु त्यांना जे जमले नाही ते एक आमदार किती काम करू शकतो,काय काम करू शकतो आणि किती विकास करू शकतो हे दाखवून दिले.शरद पवारांचा नातू अशी ओळख असली तरी देखील कर्जत जामखेड तालुक्यातील जनतेसाठी रोहित पवार यांनी मंत्रालयातील उंबरे झिजवले आहे याचे आम्ही साक्षीदार आहोत.
शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत
यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की कोणत्याही शासकीय योजनेसाठी गोरगरीब नागरीकांचा एक रुपया देखील न घेता कर्जत जामखेड तालुक्यामध्ये शासनाच्या सर्व योजनांचा लाभ त्यांना सध्या मिळत आहे.आज मतदार संघातील पाच हजार पेक्षा जास्त नागरिकांना शासनाच्या विविध योजनांच्या लाभाची प्रमाणपत्र वाटप होत असून आगामी काळामध्ये आणखी दहा हजार लोकांना याचा लाभ दिला जाणार आहे. शेवटच्या घटकापर्यंत शासनाची प्रत्येक योजना घेऊन जाणार असेही पवार यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना प्रांताधिकारी अजित थोरबोले म्हणाले की आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने कर्जत व जामखेड तालुक्यातील पाच हजार गोरगरीब नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिल्याचे प्रमाणपत्राचे वाटप राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात येत आहे.
यावेळी बोलताना संजय गांधी निराधार समितीचे सदस्य बापूसाहेब नेटके म्हणाले की आमदार रोहित पवार यांनी तालुक्यातील प्रत्येक वयोवृद्ध महिला पुरुष,विधवा महिला याशिवाय प्रत्येक गावातील गोरगरीब नागरिकांपर्यंत शासनाचे योजना घेऊन गेले आहे आज तालुक्यातील तीन ते साडेतीन हजार नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळाला आहे.
आभार तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी मानले.