संचालक मंडळाची मुदत संपल्याने सैनिक बँकेवर प्रशासक नेमावा

- Advertisement -

अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मुदत ऑगस्ट महिन्यात संपली आहे. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर बँकेची पंचवार्षिक निवडणूक लांबली आहे.

बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाच्या गैरकारभाराबाबत अनेक तक्रारी सहकार विभागाकडे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बँकेची निवडणूक होईपर्यंत प्रशासकाची नेमणुक करण्यात यावी, अशी मागणी सभासद बाळासाहेब नरसाळे, मारुती पोटघन, कॅप्टन विट्ठल वराळ, विनायक गोस्वामी, विक्रमसिंह कळमकर यांनी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संचालक मंडळाच्या गैरव्यवहाराच्या व अनियमिततेच्या अनेक तक्रारी सहकार विभागाकडे करण्यात आल्या आहेत. यातील काही प्रकरणाची चौकशी सुरू आहे. काही प्रकरणांमध्ये चौकशी अधिकार्‍यांनी संचालक मंडळाच्या गैरकारभारावर ताशेरे ओढले आहेत. गैरव्यवहारांची चौकशी सुरू असताना मुदत संपलेले संचालक मंडळ सत्तेत राहणे उचित नाही. मुदतवाढ मिळालेल्या संचालकांकडून आणखी गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रकार सभासदांच्या आणि बँकेच्या आर्थिक हितासाठी घातक असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासकाची नेमणुक करावी व बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक विहित वेळेत घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,822FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles