राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने छावणी परिषदेच्या सीईओ विक्रांत मोरे यांना निवेदन
- Advertisement -
नगर : छावणी परिषदेच्या अधिपत्याखालील स्टेट बँक चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल येथील गाळेधारक यांना कोणत्याही पध्दतीच्या सोयीसुविधा मिळत नाही त्यामुळे येथील समस्येमुळे व्यापारी त्रस्त झाले आहे. व्यापारी संकुल नगर पुणे महामार्गालगतच व अहमदनगर शहराच्या मध्यवस्तीत असल्यामुळे नगर शहरातील व परिसरातील नागरिकांनी या संकुलामध्ये गाळे घेतलेले आहेत. परंतु तळमजल्यातील दुकानांमध्ये स्लॅबमधून गळत असलेले पाणी दुकानांमध्ये टिपकत आहे. तसेच तळमजल्याच्या दुकानासमोर पावसाच्या पाण्यासाठी उघडी गटार आहे. त्यामध्ये हॉटेल व्यावसायिकांनी आपले हॉटेलचे सांडपाणी सोडलेले आहे. त्यामुळे त्या नालीतून प्रचंड दुर्गंधी येत आहे. त्यामुळे तेथील व्यावसायिकांना आपला व्यावसाय करणेही कठीण झाले आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना त्यांच्या सांडपाण्याची इतरत्र व्यवस्था करुन द्यावी. त्याचप्रमाणे या व्यापारी संकुलाच्या पार्कीमध्ये पेव्हींग ब्लॉक बसवावेत. जेणेकरुन या पार्कींगमध्ये चिखल होणार नाही. ग्राहकांना व व्यापाऱ्यांना दुकानांमध्ये व्यवस्थीत प्रवेश करता येईल.
तसेच या व्यापारी संकुलामध्ये लाईटची व्यवस्था करावी, जेणेकरुन रात्रीच्या वेळेस या ठिकाणी चोऱ्या होण्याचे प्रमाण कमी होईल. व्यापारी संकुलासमोरील उड्डाण पुलाचे काम हे नुकतेच पूर्ण झालेले आहे व उड्डाण पुलाच्या खालच्या रस्त्यालगत असलेल्या साईट गटरचे काम अर्धवट अवस्थेत असल्यामुळे महामार्गावरील सर्व पाणी हे आपल्या व्यापारी संकुलामध्ये येत असल्यामुळे दुकानांमध्ये पाणी शिरण्याचा धोका उद्भवू शकतो. व त्यामुळे दुकानासमोरील पार्किंगमध्ये कायम पाण्याचे डबके साचतात. तरी उड्डाणपुलाखालील साईड गटरचे पाणी इतरत्र वळविण्यास महामार्ग विभागास तातडीने सांगावे. तसेच व्यापारी संकुलासमोर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. तरी त्यांच्यामुळे गाळेधारकांना मोठ्याप्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तरी ते अतिक्रमण कायम स्वरुपी काढण्यात यावे. व संकुलासमोर असलेल्या रस्त्यालगतच काही मृत जनावरे तसेच मांस आणून टाकतात. त्यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दूर्गंधी पसरत आहे. तरी त्या ठिकाणी अशा वस्तु टाकण्यास मज्जाव करावा. व जे कोणी अशा पध्दतीचे कृत्य करीत असतील त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने छावणी परिषदेच्या सीईओ विक्रांत मोरे यांना निवेदनातून करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे, सुमित कुलकर्णी, धीरज उकिर्डे, इंजि. केतन क्षीरसागर, अनंतराव गारदे, शिवम भंडारी, गजेंद्र भांडवलकर, रविंद्र कर्डिले, राजू गावडे, संतोष वाबळे, हनुमंत दारकुंडे, निलेश घुले, योगेश झंवर, किशोर घोडके, धनंजय मेहेत्रे, संजय मेटकर, निजाम भाई, हसनभाई, संतोष बलदोटा, संकेत झोडगे, आदित्य दिवटे, शेरअली शेख, भैय्याशेठ परदेशी, बबन चेमटे आदी उपस्थित होते.